#Budget2021 : १५ वर्ष जुन्या वाहनांसाठी आता ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’

नवी दिल्ली : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी 11 वाजता लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे कोविडमुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व स्थितीवर मात करण्यासाठी गेल्या 10 महिन्यात घोषित आणि लागू केलेल्या विविध वित्तीय कार्यक्रमांचाच एक भाग राहील अशी अपेक्षा आहे.दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ जाहीर केली आहे. 

२० वर्षांनी खासगी वाहनांसाठी तर व्यवसायिक वाहनांची १५ वर्षांनी फिटनेस टेस्ट होईल अशी माहिती त्यांनी दिली.दरम्यान,आरोग्य क्षेत्राला अपेक्षेप्रमाणे मोदी सरकार झुकते माप देताना दिसत असून आजार रोखणं हे सरकारसमोरचं सर्वात मोठं लक्ष्य आहे असे निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना सांगितले आहे.देशात 15 आरोग्य आपत्कालीन केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. सरकारने कोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा अर्थसंकल्प संकटातील संधीप्रमाणे आहे असे देखील त्या म्हणाल्या.

टिप्पण्या