पूर्ण लॉकडाऊन केला तर उद्रेक होईल, देवेंद्र फडणवीसांचा लॉकडाऊनला विरोध
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.
ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. संध्याकाळी 5 वा. या बैठकीला सुरुवात झाली आहे.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बैठक सुरु होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आता लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही अस ठोस मत व्यक्त केले आहे.
सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित निर्णय घेण्याची ही वेळ आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तर 15 एप्रिल ते 21 एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो.
अशी शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. तर कोव्हिडसाठी 960 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे अध्याप 1200 मेट्रिक टन राज्याची उत्पादन क्षमता असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान राज्यात रेमडिसीव्हरचा तुटवडा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
मात्र दुसरीकडे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण लॉकडाऊनला विरोध केला आहे. पूर्ण लॉकडाऊन केला तर उद्रेक होईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आम्ही लोकांना समजवू, सत्ताधारी मंत्रींना सांगा, रोज केंद्राकडे बोट दाखवत असतील तर मग आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा कसे करता. सत्ताधारी मंत्र्यांना समज देण्याची गरज असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. सत्ता पक्षतील मंत्र्यांनीही राजकारण करू नये नाही तर त्यांच्ये इंटरव्ह्यू पाहिले तर आम्हाला त्याला उत्तर द्यावे लागते. मुख्यमंत्री आपण सत्ता पक्षतील मंत्र्यांना समज दिली पाहिजे असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.व्यापाऱ्यांचे गेले वर्ष त्यांचे वाया गेले.
कर, वीज बिल कर्ज व्याज भरावे लागत आहेत. त्यामुळे जीवन चालवायचे कसे हा प्रश्न जनतेसमोर आहेत. हे सर्व लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, निर्बंध असायला हवेत, पण जनतेचा उद्रेक लक्षात घ्यायला हवा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर, छोटा धंदेवाला आता पूर्णपणे संपला तर तो पुन्हा उभा राहणार नाही राज्य सरकारने थोडा डेफिसट वाढला तर त्याचा आता विचार करू नये अस फडणवीस म्हणाले आहेत.
टिप्पण्या