मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री ; दारू ,सिगारेट, तंबाखू महागणार

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाच्या अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सडकून टीका करण्यात येत आहे. काही क्षेत्रांना या अर्थसंकल्पात मदतीचा हात देण्यात आला आहे, तर काही गोष्टी महाग केल्या आहेत. 

मद्यप्रेमींना या अर्थसंकल्पाने जोरदार झटका दिला आहे. अर्थसंकल्पात मद्य आणि तत्सम पेयच्या किंमतीमध्ये मोठी वाढ जाहीर केली आहे.अल्कोहोलयुक्त पेयांवरील सेसच्या दरात आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये तब्बल १०० टक्क्यांनी वाढ करण्यात आल्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मद्य आणि मद्ययुक्त पेय यांच्या किमतीत वाढ होणार आहे.

मद्य आणि संबंधित उत्पादनांवर १०० टक्के कृषी सेस लागू केल्याने आता हे सर्व पैसे केंद्र सरकारच्या हातात जाणार आहेत. यापूर्वी मद्यावर १५० टक्के कर असला तरी तो थेट केंद्र सरकारच्या हातामध्ये जात नव्हता. त्याची वेगवेगळ्या भागांमध्ये विभागणी होत होती. मात्र, नव्या निर्णयामुळे हा कर थेट केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होईल.

या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे.

टिप्पण्या