पुण्यात पोलीसांवर होतोय हल्ला!!बाचाबाचीच्या रागातून वाहतूक पोलिसावर लोखंडी रॉडने हल्ला
चाकण, 31 जानेवारी : पुणे (Pune) जिल्ह्यातील चाकण (Chakan) येथे ड्युटीवर तैनात असलेल्या वाहतूक विभागाच्या पोलिसावर अज्ञात इसमानी दुचाकी वरून येऊन हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे.चाकण येथे शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई रवींद्र करवंदे हे ड्युटीवर असताना आपले कर्तव्य बजावत असताना दोन अज्ञात इसमानी दुचाकी वरून पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
या हल्ल्यात करवंदे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चाकण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.कर्तव्यावर असताना असा हल्ला होणे अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाची पिंपरी चिंचवड पोलिसांनी गंभीर दखल घेत हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना रात्री उशिरा ताब्यात घेतले असून रोहीत साळवी व हर्षदिप कांबळे अशी हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे आहे.हे दोन्ही आरोपी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील रहिवासी आहेत. कंटेनर पाठीमागे घेण्यावरून चाकण चौकात बाचाबाची झाल्याने हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.
टिप्पण्या