‘तुमच्या तोंडात साखर पडो’, केंद्रात मंत्रीपद मिळणार का? असा प्रश्न विचारताच राणेंची प्रतिक्रिया;

सिंधुदुर्ग : ग्रामपंचायत निवडणुकीत कोकणात भाजपने शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का दिल्यानंतर नारायण राणे यांचे भाजपातील वजन वाढल्याची चर्चा आहे. शनिवारी सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनींच यावर भाष्य केले आहे. पत्रकार परिषदेत त्यांना मंत्रीपद मिळणार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता.ग्रामपंचायत निवडणुकीत राणे यांच्या नेतृत्त्वामुळे शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान देणे भाजपला शक्य झाले. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी नारायण राणे यांच्या कामगिरीवर खुश असल्याचे स्पष्ट आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने नारायण राणे यांना वाय दर्जाची सुरक्षाव्यवस्था देऊ केली आहे. त्यामुळे नारायण राणे यांचे भाजपमधील वजन वाढल्याचे बोलले जात आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून नारायण राणे यांना केंद्रातील मंत्रिपदाविषयी विचारणा केल्यानंतर राणे यांनी ‘मला याबाबत काही माहिती नाही. पण तुमच्या तोंडात साखर पडो’, अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी नारायण राणे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत देखील भाष्य केले आहे. राज ठाकरे यांचा दौरा यशस्वी होवो हीच शुभेच्छा. एखाद्या नेत्याला वाटलं जावं, दर्शन करावं तर यावर काय बोलणार? पण दौरा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.


 
महत्वाच्या बातम्या



 


टिप्पण्या