किरीट सोमय्या अडचणीत; मुलाविरुद्ध खंडणीचा आरोप, पोलिसांकडून चौकशी;
किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप, सोमय्या कुटुंब अडचणीत
मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी काही वेळापूर्वीच नील सोमय्या यांना पोलीस ठाण्यात बोलावले होते. मुलूंड पोलीस ठाण्यात नील सोमय्या यांची तब्बल चार तास कसून चौकशी झाली आहे.
राज्यात महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून किरीट सोमय्या यांनी सातत्याने सरकारच्या त्रुटी शोधून काढल्या आहेत. त्यांनी गेल्या काही काळात ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आणली आहेत. प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांच्या ईडी चौकशीवेळी तर किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला सळो की पळो करुन सोडले होते. अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरे यांच्यातील जमीन व्यवहाराच्या मुद्द्यावरुन त्यांनी थेट शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांना अंगावर घेतल्याने शिवसेनेच्या नेत्यांकडून किरीट सोमय्या यांना आम्हीही तुमचे घोटाळे बाहेर काढू, असा इशारा दिला गेला होता.
दरम्यान, नील सोमय्या यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पार पडली आहे. नील सोमय्या भाजपचे नगरसेवक आहेत.
टिप्पण्या