क्रीडा धोरणाला चालना देण्यासाठी क्रीडा संकुलाचे काम दर्जेदार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे – महाराष्ट्र स्पोर्टस इंन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट प्लॅन अंतर्गत राज्यात क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहे. क्रीडा धोरणाला चालना देण्यासाठी क्रीडा संकुलाचे काम दर्जेदार करा असे, निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय क्रीडा संकुल, येरवडा व जिल्हा क्रीडा संकुल, बारामती येथील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी विभागीय व जिल्हा क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक व्ही.व्ही. आय.पी. सर्कीट हाऊस येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, प्रातांधिकारी दादासाहेब कांबळे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक तथा सदस्य सचिव विजय संतान, माहिती उपसंचालक राजेंद्र सरग, बारामतीचे मुख्याधिकारी किरण यादव यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते. मागील बैठकीचे इतिवृत्त व बैठकीचे प्रास्ताविक क्रीडा व युवक सेवा उपसंचालक तथा सदस्य सचिव विजय संतान यांनी सादर केले.
टिप्पण्या