Maharashtra Lockdown : महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लागणार? #Lockdown | #Maharashtra | #UddhavThackeray
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन (Maharashtra lockdown) आवश्यक असल्याचा पर्याय सरकारकडे आहे. मात्र त्याबाबत विरोधी पक्षांची भूमिका काय हे जाणून मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. (Maharashtra may impose 3 Weeks Lockdown CM Uddhav Thackeray calls all party meet amid corona virus)
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळतोय. राज्यातील प्रत्येक शहरात दररोज हजारांच्या घरात कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. मृत्यूदरही वाढल्याने स्मशानभूमी फुल्ल झाल्या आहेत. आणि त्यामुळे कधी एकाच सरणावर 8 मृतदेह तर कधी एकावेळी 22 मृतदेहांना अग्नी द्यावा लागतो. त्यामुळेचकडक पावलं उचलण्याची गरज असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
टिप्पण्या