''देश संकटात आहे, मला जाऊ द्या''

एका व्यक्तीला पोलिसांनी लॉकडाऊन दरम्यान हटकलं. पोलिसांनी जामिया परिसरात या व्यक्तीला रोखलं. या व्यक्तीनं सांगितलेलं कारण ऐकून पोलिसांनी अक्षरश: डोक्यावर हात मारला. मी दारू आणायला जात आहे. माझा देश संकटात आहे. त्यामुळे मी दारू आणायला निघालो आहे. यामुळे सरकारला महसूल मिळेल, असा युक्तीवाद या व्यक्तीनं केला. पोलिसांनी त्या व्यक्तीकडून दंड आकारला आणि त्याला घरी जाण्यास सांगितलं.वीकेण्ड लॉकडाऊन असल्यानं ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. नागरिकांनी नियमांचं उल्लंघन करू नये यासाठी पोलीस तैनात आहेत. नियम मोडणाऱ्यांना पकडून पोलीस त्यांच्याकडून दंड आकारत आहेत. मात्र तरीही अनेक जण नियम मोडत आहेत. भाजी आणायला जात आहे. पीठ संपलं आहे. ते आणायला जात आहे, अशी एकापेक्षा एक कारणं नागरिक देत आहेत. काही जण तर पोलिसांशी विनाकारण हुज्जत घालत आहेत.

टिप्पण्या