सर्वपक्षीय बैठक सुरवात!!!

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना संक्रमणामुळे परिस्थिती भयंकर होऊ लागली आहे. दिवसाला राज्यात ५० हजारांपेक्षा कोरोना रूग्ण आढळत आहेत. 

त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 

या बैठकीनंतर राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत घोषणा होऊ शकते.राज्यात कोरोना संक्रमक रोखण्यासाठी ठाकरे सरकारनं ३० एप्रिलपर्यंत वीकेंड लॉकडाऊन लावला आहे. त्याचसोबत नाईट कर्फ्यूसारखी विविध निर्बंध लावले आहेत. तरीही राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्येत घट होताना दिसत नाही. अशातच सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची मागणी करत आहेत.महाराष्ट्रात ३ आठवड्यांसाठी लॉकडाऊनदरम्यान, कम्युनिटी स्तरावर संक्रमण पसरणे आणि लोकांचे मृत्यू रोखण्यासाठी ट्रेन आणि सार्वजनिक ठिकाणी बंदी यावर निर्बंध आखायला हवेत. मदत आणि पुनर्वसन मंत्री या नात्याने मी फक्त वीकेंड लॉकडाऊन नको तर ३ आठवड्यापर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लावावा अशी मागणी करतो. कम्युनिटी स्प्रेड रोखण्यासाठी आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे गरजेचे आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

टिप्पण्या