चक्क!!!... रात्री गावाकडे जाण्यासाठी वाहन न मिळाल्यामुळे तरुणांनी बस पळवली! लातूरमधील प्रकार
लातूर : रात्री उशिरा गावाकडे जायला एसटी नाही म्हणून बस स्थानकातून एसटीच पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी बस स्थानकातील ही घटना आहे.
दारुच्या नशेत तरुणांनी हे कृत्य केल्याचं समजतं.रात्री उशिरा गावात जाण्यासाठी एसटी नसल्याने दारुच्या नशेत शेळगी गावातल्या तरुणांनी एसटीच पळवून नेली.
एसटी पळवताना लाईटच्या दोन खांबांना देखील जोरात धडक बसल्याने विजेच्या तारा तुटून खाली पडल्या, शिवाय विजेचा खांब देखील कोसळला आहे.
एसटीनं विजेच्या खांबाला धडक दिल्यानं २५ हजारांचं नुकसान झालं आहे. मात्र अद्याप तरी एसटी महामंडळाकडून याबद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही. यामुळे एसटी व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार समोर आला असून प्रशासन एसटी पळवणाऱ्यांना पाठिशी घालत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
टिप्पण्या