राणेंवर अन्याय करणार नाही, त्यांचा सन्मानच करु : अमित शहा
सिंधुदुर्ग : भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं आहे.
अमित शहांच्या या कोकण दौऱ्याला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे.यावेळी अमित शहा बोलताना त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी तुफान फटकेबाजी केलेली आहे, “नारायण राणे यांच्या छवीचं अनेक प्रकारे लोक वर्णन करतात. मात्र, मी म्हणेल, जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे ते संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायविरोधात लढू शकत नाही.
ते जनतेविराधात लढू शकत नाही. नारायण राणे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी अन्यायाला वाचा फोडत आपल्या भविष्याचा विचार करत पावलं टाकली.त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द फार हिरतीफिरती आहे. मला काही पत्रकार प्रश्न विचारतात, तुमच्याकडे त्यांच्यावर अन्याय झाला तर? मी सांगितलं, आम्ही अन्याय करणार नाही.
आम्ही त्यांचा सन्मानच करु. तुम्ही चिंता करु नका. नारायण राणे यांना कसं साभाळावं आणि सन्मान करावं, ते भाजपला माहिती आहे”, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
भाजपचे बडे नेते एकत्र आले असून हा कार्यक्रम जरी राजकीय नसला तरी राज्यातील राजकारणावर हे नेते काय भाष्य करणार याची उत्सुकता वाढली होती. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपपूर्वी फासे बदलणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अमित शाह राज्यात आल्याने ऑपरेशन लोटस चा मुहूर्त ठरणार का ? अशा चर्चा देखील सुरु झाल्या होत्या.
टिप्पण्या