राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली, पंजाबमध्ये आता गुंडाराज !!!!

जलालाबाद : पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला ८ महानगरपालिका, १०९ नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. जलालाबादमध्ये निवडणुकीसाठी मंगळवारी अकाली दलाचे उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी आले असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.

जलालाबादमध्ये शिरोमणी अकाली दल आणि कॉंग्रेस कार्यकर्ते यांच्यात आज जोरदार धुमश्चक्री उडाल्याचे पाहायला मिळाले. या वेळी शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला करुन त्यांच्या गाडींची तोडफोड करण्यात आली आहे. यावरुन संतप्त झालेल्या अकाली दलाने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.झेड’ दर्जाची सुरक्षा असलेल्या व्यक्तीवर हल्ला होत असेल तर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. 

राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. गँगस्टर पंजाबमध्ये आता गुंडाराज चालवत आहेत. अशा प्रकारचे हल्ले होत असताना पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत’ असे म्हणत अकाली दलाच्या नेत्या व माजी केंद्रीय मंत्री हरसिमरतकौर सरकारवर बरसल्या आहेत.पोलिसांच्या पाठबळावर काँग्रेसच्या गुंडांनी बादल यांच्यावर हल्ला केला. बादल यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या अकाली दलाच्या तीन कार्यकर्त्यांना गोळ्या लागल्या आहेत

राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राजीनामा द्यायला हवा. याचबरोबर या घटनेची चौकशी पंजाब व हरियाना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हावी. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या काळात राज्यात लोकशाहीची हत्या सुरू आहे’ असे म्हणत अकाली दलाचे प्रवक्ते दलजितसिंग चीमा यांनी पंजाबमधील सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

टिप्पण्या