पुणे शहर-दि२८ पुण्यात येतायत फेक CALL 'मी अमोल कोल्हे बोलतोय' असं म्हणत पैशांची मागणी करणाऱ्या भामट्याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने चंद्रकांत पाटील यांच्या नावानेही बांधकाम व्यावसायिकांना फोन करुन पैशांसाठी धमकावलं होतं. https://marathi.abplive.com/news/pune/pune-police-arrests-a-extortion-seeker-in-the-name-of-amol-kolhe-and-chandrakant-patil-858057
वानवडी भागातील एका बांधकाम व्यावसायिकाला त्याने 'मी अमोल कोल्हे बोलतोय' असं म्हणत पैशांची मागणी केली होती. खासदार कोल्हे यांना हे समजताच त्यांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर पुन्हा एकदा विशाल शेंडगेला पुण्यातील वानवडी पोलिसांनी अटक केली. विशाल शेंडगे यांनी आणखी कोणत्या नेत्यांच्या नावे खंडणी उकळण्याचा प्रकार केलाय का याचा पोलिस तपास करत आहेत.
टिप्पण्या