मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका उडाला आहे...
Diesel-Petrol Price Today: मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव जवळपास 93 रुपये, तर याठिकाणी 101 रुपये आहे किंमत
Diesel-Petrol Price, 29th january 2021: भारतीय तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) आज शुक्रवारी देखील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. इथे तपास तुमच्या शहरात किती दराने विकले जात आहे इंधननवी दिल्ली, 29 जानेवारी: भारतीय तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) आज शुक्रवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये (Diesel Petrol Price Today) कोणताही बदल केला नाही आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचे भाव 86.30 रुपये प्रति लीटर आहेत.
दरम्यान मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. याठिकाणी दर जवळपास 93 रुपये प्रति लीटरच्या आसपास आहेत. देशातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगर याठिकाणी पेट्रोलचे दर 101 रुपये प्रति लीटर झाले आहेत.गेल्या 27 दिवसापैकी एकूण 10 दिवसच इंधनाचे दर वाढले आहेत. मात्र या दिवसात पेट्रोल एकूण 2.59 रुपये प्रति लीटरने महागले आहे. तर डिझेलच्या किंमतीमध्ये 02.35 रुपये प्रति लीटरची वाढ झाली आहे.दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
टिप्पण्या