१०००० कोटींचं साम्राज्य असणाऱ्या "बिग बुल"च्या टिप्सनी तुम्हीही व्हाल मालामाल!
पैसे किती कमवावेत? याचं नेमकं उत्तर कोणीच सांगू शकणार नाही. आजची सोय आणि उद्याची तरतूद करून ठेवणे म्हणजे तुमचं ‘आर्थिक आरोग्य’ चांगलं आहे असं म्हणता येईल.सध्या नोकरी मध्ये असलेल्या अनिश्चिततेमुळे प्रत्येक जण काही न काही दुसऱ्या कमाईचे साधन शोधत असतो. काही जण ऑनलाईन एखादं आवडीचं काम करून आपल्या दर महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या रकमेत वाढ करत असतात.
उपलब्ध पर्यायांपैकी शेअर मार्केट हा सर्वांसाठी उत्पन्नाची समान संधी असणारा मार्ग आहे.स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे फक्त काही शेअर्स, म्युचल फंड विकत घेऊन थांबणे असं नाहीये. एक तर तुम्ही किंवा तुमच्या प्रतिनिधीने सतत मार्केट मधील उतार चढाव बघत रहाणे आणि आपले पैसे त्यानुसार गुंतवणे हे तुमचा फायदा निश्चित करत असतं.
५००० करोड इतकी संपत्ती शेअरमार्केट मधून कमवून नुकताच राकेश झुंझुनवला यांनी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ते स्वतः ‘रेअर इंटरप्राइजेस’ या असेट मॅनेजमेंट कंपनीचे पार्टनर आहेत.त्यासोबतच ते सध्या जगातील ७९१ वे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती सध्या २८० करोड युएस डॉलर्स इतकी आहे.
हे रातोरात झालं नाहीये.तेव्हा स्टॉक इंडेक्स हा १५० वर होता, आज तो ३६,००० वर आहे. स्टॉक इंडेक्स म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये नोंदवलेल्या कंपनीची सध्याची आर्थिक स्थिती असं म्हणता येईल.राकेश झुंझुनवला यांनी हा प्रवास पूर्ण केल्यावर आपल्या अनुभवाचे बोल मीडिया सोबत बोलतांना सांगितले आहेत. त्यापैकी ७ मुख्य टिप्स अश्या आहेत:आज पैसे गुंतवले आणि उद्या फायदा झाला असं स्टॉक मार्केट मध्ये होत नाही. ज्यांची अशी अपेक्षा आहे त्यांनी सोनं खरेदी,
प्लॉट्स मध्ये गुंतवणूक करून आपल्याला अपेक्षित तो फायदा कमवावा.एक गुंतवणूकदार हा कधीच घाईत नसला पाहिजे. जसं एखादं बाळ मोठे होईपर्यंत वाट बघावी लागते, तसंच शेअर मार्केट मध्ये सुद्धा पैसे गुंतवून तुम्हाला फायदा मिळेल यासाठी संयम ठेवावा लागतो. मग काय करायचं ?
ते पुढच्या मुद्द्यात राकेश यांनी सांगितलं आहे.संधी ओळखणं आणि त्यावर कृती करणं हे गुंतवणूकदाराचं खरं कसब आहे. कोणती संधी चांगली? हे तुम्हाला सुरुवातीला तुमचे स्टॉक प्रतिनिधी शिकवत असतात.अधिक फायद्याच्या संधी या तंत्रज्ञान, मार्केटिंग, ब्रँड्स कंपनी मधून सतत उपलब्ध होत असतात. त्यांच्यावर बारीक नजर ठेवणे हे गुंतवणूकदाराकडून अपेक्षित असतं.अधिक फायदा कमावण्यासाठी बऱ्याच वेळेस आपण अधीर असतो आणि त्या नादात चुका करत असतो. “चुका तर होतीलच” हे मान्य करा,
फक्त त्या फार मोठ्या प्रमाणावर करू नका असं राकेश झुंझुनवला सांगतात.चूक पण अशी करा, ज्याची भरपाई तुम्ही स्वतः करू शकतात. चूक म्हणजे एक प्रकारचा धोका म्हणता येईल, तो किती पत्करायचा हे एक गुंतवणूकदारच ठरवू शकतो. हे ध्यानात ठेवावं आणि आपली पाऊलं उचलावीत.
कोणत्याही कंपनी किंवा कमोडिटी मध्ये गुंतवणूक करतांना त्याच्या मागच्या काही दिवसातील ट्रेंड बघा. तुमचा अंदाज हा बऱ्याच वेळेस बरोबर असतो यावर विश्वास ठेवा.गुंतवणूकदार व्यक्तीचा ‘कॉमन सेन्स’ हा खूप चांगला असणं आवश्यक आहे. हे सांगताना राकेश यांनी दोन उदाहरण दिली आहेत.प्रत्येक मार्केटची बातमी योग्य नसते. इन्फ्लेशन, डेफिसीट या काही गोष्टी कळत नसतील तर त्यांचा फार ताण घेऊ नका.
ज्या कंपनीच्या कामाबद्दल माहीत आहे त्यामध्ये गुंतवणूक करा आणि त्याकडेच लक्ष द्या.काही वस्तू असतात जश्या की, वीज ज्याची की मागणी अचानक वाढत नसते. त्यांच्या मध्ये गुंतवणूक करणं म्हणजे पैसे एका ठिकाणी थांबवून ठेवणं आहे. त्याऐवजी ज्या गोष्टीची मागणी वाढते तश्या फूड इंडस्ट्री मध्ये गुंतवणूक करा.कोणत्याही कंपनीच्या फक्त नावाने हुरळून जाऊ नका. ती कंपनी तुम्हाला किती फायदा करून देत आहे याकडे लक्ष द्या.
‘लार्ज कॅप’, ‘स्मॉल कॅप’ याकडे न बघता कंपनीच्या काम करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करा आणि मग गुंतवणूक करा.सतत फायदा होणारी किंवा मागणी असलेली कंपनीच तुम्हाला फायदा करून देऊ शकते हे लक्षात ठेवा ती कितीही छोटी असो किंवा मोठी असो.‘ट्रेडर’ म्हणजे दुसरा कोणी नसून एक दुकानदार असतो हे लक्षात ठेवावं आणि स्वस्त शेअर्स विकत घ्यावेत आणि ते महाग झाले की विकून टाकावेत ही राकेश झुंझुनवला यांच्या टिप्स मधील ‘बॉटम लाईन’ म्हणता येईल.
टिप्पण्या