अनेकजण पक्ष सोडून गेले मात्र – जयंत पाटील

 
अनेकजण पक्ष सोडून गेले मात्र आजही राष्ट्रवादी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता पक्षासाठी काम करतोय – जयंत पाटील
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात आपल्याला एकही जागा लढवता आली नाही. त्यामुळे अनेकजण पक्ष सोडून गेले मात्र आजही राष्ट्रवादी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता राजुरा मध्ये पक्षासाठी काम करत आहे.त्या सर्व कार्यकर्त्यांचे,पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कौतुक केले.राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष आहे. तेव्हा आपण पक्ष वाढविण्यासाठी आता कंबर कसली पाहिजे. अनेक जण पक्षात येण्यास इच्छुक असतात अशा लोकांना पक्षात येण्यास प्रोत्साहित करा, पक्षाची बुथ कमिटी मजबूत करा, संपर्क वाढवा असे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केले.

आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर संघर्ष करा… संघर्षाशिवाय गत्यंतर नाही… या संघर्षातून तुम्ही मार्ग काढला तर उद्याचा सुर्य राष्ट्रवादीचा असेल असे आवाहनही जयंत पाटील यांनी युवकांना केले.यावेळी माजी मंत्री रमेश बंग, विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

टिप्पण्या