‘अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्व’

पुणे:- केंद्रातील भाजप सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ माजली होती. दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढणार असं चित्र निर्माण झालं होतं.

मात्र सरकारच्यावतीने केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, देवेंद्र फडणवीस व भाजपच्या इतर नेत्यांनी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन पुन्हा एकदा अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, काँग्रसे नेते डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे. 

अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे उघड आहे, अशी खोचक टीका भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे.अण्णा हजारे हे हास्यास्पद व्यक्तिमत्त्व झालं आहे. त्यांच्या आंदोलनाचा बोलविता धनी कोण आहे हे सुद्धा उघड झालं आहे. अण्णा म्हणजे महात्मा गांधी नव्हेत. 2009 मध्ये त्यांनी केलेलं आंदोलन हा त्यांच्या प्रसिद्धीसाठीच्या नियोजनाचा भाग होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचा काय उल्लेख करायचे हे सर्वांनाच माहीत आहे, असा चिमटा मुणगेकर यांनी काढला आहे.

टिप्पण्या