संज्या कधीतरी डोकं लावून बोलत जा, निलेश राणेंचा हल्लाबोल....
मुंबई : कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.
प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असताना शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला आणि या आंदोलनाला गालबोट लागले. चिघळलेल्या शेतकरी आंदोलनात सामील असलेला आरोपी दीप सिद्धू याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप खासदार सनी देओल यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत.
यावरूनही भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील या मुद्द्याला स्पर्श करत भाजपवर टीकास्त्र डागले होते.यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर तोफ डागली आहे.
‘उद्या कुणी येऊन संज्या राऊत सोबत फोटो काढेल आणि सिंघू बॉर्डरवर जाऊन भाषण करेल, तर संज्याला अटक करायची का? आमचेही उद्धव ठाकरे सोबत फोटो आहेत उद्या आम्ही भडकाऊ भाषण केलं तर त्याला जबाबदार उद्धव ठाकरे असणार आहेत का? संज्या कधीतरी डोकं लावून बोलत जा.’ अशा आशयाचे ट्वीट करत निलेश राणे यांनी राऊत यांच्यावर घणाघात केला आहे.
टिप्पण्या