महाविकास आघाडीचे मंत्री मराठ्यांच्या जीवावर उठलेत, विनायक मेटेंची संतप्त प्रतिक्रिया

औरंगाबाद : अनेक राजकीय नेते मराठ्यांच्या जीवावर मोठे होतात. संपत्ती कमावून साम्राज्य निर्माण करतात. आणि आता तेच मंत्री मराठ्यांच्या जीवावर उठले आहेत. आपापल्या खात्यात नोकरभरती सुरू करणारे मंत्री हे मराठा समाजाचे मारेकरी आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसंग्रामचे नेते आ. विनायक मेटे यांनी दिली आहे. राज्य सरकारने नोकरभरती सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मेटेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल राज्य सरकारने न घेतल्याच्या निषेधार्थ येत्या ७ फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा जालना येथे शिवसंग्रामच्या वतीने एल्गार मेळावा घेण्यात येणार आहे.

हा मेळावा आक्रमक राहील. याद्वारे मराठा समाजाचा असंतोष प्रकट करण्यात येईल. नांदेड येथे अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात, नागपूरला नितीन राऊत व अनिल देशमुख यांच्या विरोधात, मुंबईत वर्षा गायकवाड आणि अनिल परब यांच्या विरोधात तर बारामती येथे शरद पवार यांच्या विरोधात एल्गार मेळावे घेण्याची घोषणा विनायक मेटे यांनी यावेळी केली. मंत्र्यांना भानावर आणण्यासाठी आणि सत्तेमुळे आलेला त्यांचा माज उतरविण्यासाठी एल्गार मेळावे आहेत, असे त्यांनी सांगितले.


 
या आहेत मागण्या
राज्य सरकारने साष्टपिंपळगावच्या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी, एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, नोकरभरती पुढे ढकलण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षण सुनावणीत हरिश साळवे यांना सहभागी करून घ्यावे.

महत्वाच्या बातम्या




 


टिप्पण्या