हिंदू धर्मात चारधाम आहेत नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही – नवाब मलिक

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. येत्या १ ते ९ मार्च दरम्यान राज यांच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन पक्षाकडून केलं जात असल्याचं समजतं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची आज दुसऱ्यांदा महत्वपूर्ण बैठक झाली आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला राज्यातील मनसेचे सर्व बडे नेते उपस्थित होते .

मनसेने पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर हिंदुत्वाच्या मार्गावर पक्ष लक्ष केंद्रीत करत असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात भाजप आणि मनसेची युती होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. विशेष म्हणजे, युतीच्या या गणितांबाबत भाजप नेत्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी वेळोवेळी थेट नकार देखील दिलेला नाही. आता त्यांच्या अयोध्येच्या दौऱ्याच्या घोषणेमुळे राजकीय क्षेत्रात रंगत आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंच्या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील अयोध्येला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यामुळे आता अयोध्या दौऱ्यावरून राज्यातील राजकारण रंगताना दिसत आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दोघांच्या दौऱ्यावर टीकास्त्र सोडलं आहे.‘नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत. 

त्यामुळे लोकांनी केवळ अयोध्येत जाण्याऐवजी बद्रीनाथ किंवा पशुपतीनाथ येथेही जावे’ असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे या नेत्यांच्या दौऱ्यावर लगावला आहे. तर, ‘उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा अन्य कुठलेही नेते असोत प्रत्येकाची आस्था असते. या देशात प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आहे. हा प्रत्येक नागरिकाचा मौलिक अधिकार आहे. त्यामुळे ते त्यांना हवं त्याठिकाणी जाऊ शकतात’ असं देखील ते म्हणाले आहेत.

#punenews #brekingnews

टिप्पण्या