कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय!

नवी दिल्ली | केंद्रीय गृह मंत्रालयाने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या नव्या गाईडलाईन्सनुसार फेब्रुवारी महिन्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी स्विमिंग पूल सुरु होऊ शकणार आहेत.केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या गाईडलाईन्स देशातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होणार आहेत.याआधी चित्रपट गृहांमध्ये 50 टक्के प्रेक्षकांसाठी परवानगी देण्यात आली होती. आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर राजकीय आणि धार्मिक आंदोलनांना परवानगी देण्याबाबतची जबाबदारी राज्य सरकारांना देण्यात आली आहे.

टिप्पण्या