श्रीमंत होण्यासाठी आजपासूनच या 6 गोष्टी सोडून द्या, उद्या तुम्ही श्रीमंत झालेच म्हणून समजा !
सध्याच्या स्पर्धेच्या काळामध्ये श्रीमंत होणे सहजासहजी शक्य नाही. श्रीमंत होण्यासाठी आपल्याला काही गोष्टी आत्मसात कराव्या लागतात तर काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. जास्त संपत्ती असणे आणि समाजामध्ये आपली एक वेगळी ओळख असणे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.
परंतु काहीच लोकांचे हे स्वप्न पूर्ण होते. मित्रांनो आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला अश्या काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही सोडून दिल्या तर उद्या तुम्ही श्रीमंत झालेच म्हणून समजा.
१ मित्रांनो श्रीमंत होण्यास सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे उदासीनता. काही लोकांची सवय असते गरिबी सहन करण्याची. त्यांच्यामध्ये महत्त्वाकांक्षा नसते. ती लोक जीवनात मिळणाऱ्या मोबदल्याचा विनातक्रार स्वीकार करतात. मानसिक व शारीरिक आळस, उत्साह आणि कल्पनाशक्तीचा अभाव. पुढाकार घेण्याची तयारी नसणे. हे सर्व उदासीनतेचे कारणे आहे. या उदासीनतेमुळे अशी लोक कधीच श्रीमंत होऊन शकत नाहीत. त्यामुळे श्रीमंत व्हायचे असेल तर तुमच्यातील उदासीनता आजच काढून टाका.
२ गरीब, अपयशी लोकांमध्ये सर्वात वाईट गोष्ट असते ती म्हणजे शंका. अपयश आल्यानंतर सबबी आणि कारणं पुढं करणं. अपयशाचे स्पष्टीकरण देत बसने. यशस्वी लोकांच्या यशाबद्दल शंका व्यक्त करणे. जी लोक स्वतः यशस्वी होत नाहीत आणि दुसऱ्यांच्या यशाबद्दल शंका व्यक्त करतात ती लोक कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत. त्यामुळे श्रीमंत व्हायचे असेल तर इतरांच्या यशाबद्दल शंका व्यक्त करणे बंद करा.अनेक लोक गरीबच राहतात कारण ते त्यांचे निर्णय घेण्यास सक्षम नसतात. ती लोक स्वतःच्या गोष्टींबद्दलचा निर्णय इतरांकडून घेतात. ती लोक त्यांच्या निर्णयावर ठाम नसतात. जी लोक निर्णय घेण्यास ठाम नसतात ती कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. त्यामुळे मित्रांनो आपले स्वतःचे निर्णय इतरांना घेऊ देऊ नका.
३ स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा.लोक गरीब असण्याचे आणखीन एक कारण म्हणजे मिळकतीपेक्षा जास्त खर्च करणं. म्हणजे जेवढे उत्पन्न आहे त्यापेक्षा जास्त खर्च करणे आणि कर्जबाजारी होणे. यापेक्षा जर अश्या लोकांनी उत्पन्न वाढवले आणि खर्च जश्याच तसा ठेवा तरीही ही लोक श्रीमंत होऊ शकतात.
४ गरीब लोक हे नेहमी चिडचिड करत असतात. ते नेहमी इतरांना रागवत असतात. अश्या लोकांनी चिडचिड करण्याचे सोडून, इतरांवर रागवायचे सोडून जर शांत डोक्याने सर्वांशी प्रेमाने वागले तर ते नक्कीच श्रीमंत होऊ शकतात.
५ लोक गरीब असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांना जडलेल्या वाईट सवयी. वाईट गोष्टींचे सेवन करणे. आणि स्वतःच्या व्यक्तीमत्वाकडे दुर्लक्ष करणे. ज्या लोकांना वाईट सवयी जडलेल्या असतात अश्या लोकांकडे समाज नेहमी दुर्लक्ष करतं. आणि अशी दुर्लक्षित लोक कायम गरीबच राहतात. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर वाईट सवयी आणि वाईट गोष्टींचे सेवन करणे आजच सोडून द्या.गरीब लोक हे सकारात्मकतेऐवजी नकारात्मतेकडे लक्ष देतात. त्यामुळे ते कायम गरीबच राहतात. नेहमी अपयशाचा विचार करणारे आणि कायम अपयशाची भीती मनामध्ये ठेवणारे लोक हे अपयशीच होतात. आणि कायम गरीबच राहतात. योग्य संधीचा आणि योग्य वेळेचा वापर न करणे हे गरिबीचे सर्वात मोठे कारण आहे. यशस्वी लोकांपासून प्रेरणा घेण्याऐवजी अपयशी लोकांचा विचार करणे यामुळे लोक गरीब राहतात.ज्या लोकांची काम टाळण्याची वृत्ती असते ती लोक कधीच श्रीमंत होत नाहीत. श्रीमंत होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी नेहमी कोणते ना कोणते काम करत राहिले पाहिजे.
आजचे काम उद्यावर ढकलणे, उद्याचे काम परवावर ढकलणे. आलेल्या समस्येचा सामना करण्याऐवजी त्या समस्येपासून दूर पळून जाणे हेही सर्वात मोठे गरिबीचे कारण आहे. त्यामुळे आलेल्या समस्येचा समान कारण आणि श्रीमंत व्हा. मित्रांनो वरील गोष्ट करण्याच्या सोडून द्या, उद्यापासून तुम्ही श्रीमंत झालेच म्हणून समजा.
लेख आवडला असेल तर आवर्जून लाईक आणी शेअर करा पुणे न्युज २४.
टिप्पण्या