धक्कादायक पुण्यातल्या जवळजवळ प्रत्येक भागात गेली काही वर्ष रात्री 12 च्या सुमारास येणारे अनुभव
पुण्यातल्या जवळजवळ प्रत्येक भागात गेली काही वर्ष रात्री 12 च्या सुमारास येणारे अनुभव.
कुठल्यातरी छपरीचा वाढदिवस असतो.
26 ते 30 ची कंबर असणारी 40-50 पोरं 15 -20 बाईक्स वर ट्रिपल सीट आणि 32 ते 48 कंबर असणारे बाप्पे 2-3 कार मधे बसून साडेअकरा पासून एरियात ढुंगणाला कुत्रा चावल्यासारखं किंचाळत - बोंबलत फिरतात.
मग 12 वाजता त्या भागातल्या कुठल्यातरी आतल्या बाजूच्या चौकात सोबत आणलेले 3-4 केक तलवारीने किंवा मोठया चाकूने कापून फटाके फोडून परत एकदा कोकलतात. एकमेकांच्या तोंडाला केक फासून झाल्यावर यांचा तमाशा बघायला जमलेल्या गल्लीतल्या कुत्र्यांच्या अंगावर मोठ्यानं ओरडत जाऊन त्यांना घाबरवणं, सोबतचे केक -बिअर वगैरेचा कचरा चौकातच फेकून देणं, थोड्या फार शिव्या देऊन ओरडणं असले चाळे करून झाले की 12:30 नंतर परत आरडाओरडा करत निघून जातात.
दुसऱ्या दिवशी नागरिकांना नेमक्या कुठल्या छपरीचा बड्डे होता ते चौकात फ्लेक्सवर लागलेलं त्याचं थोबाड बघून कळतं. रात्री त्याच्या सोबत आरडाओरडा करून चौकात घाण करणारी डुकरं नेमकी कोण होती त्यांचेही चेहरे शुभेच्छुक मधे बघता येतात.
दोन चार शिव्या हासडून नागरिक पुढे चालू लागतात .
दोन चार दिवसांनी त्यांच्यातल्याच दुसऱ्या एका भाईचा बड्डे येतो.
चक्र सुरु राहतं.
- अद्वैत खटावकर
फोटोचं ठिकाण - तळजाई टेकडी, पुणे
Photo Credit - Omkar Deochake
#punenews24
टिप्पण्या